Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  २५ फेब्रुवारीपासून
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तशी विनंती राज्यपालांना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला सादर होणार आहे.
 
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताना शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १८ फेब्रुवारीपासून सुरु होईल असे विधिमंडळात जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आता २५ पासून सुरू करावे, अशी विनंती वित्त विभागाकडून करण्यात आली होती.
केंद्र सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याने राज्य सरकारही संपूर्ण वर्षभाराचा अर्थसंकल्प फेब्रुवारीतील अधिवेशनात सादर करू शकणार नाही. त्यामुळे राज्याकडूनही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. याआधी २००९ व २०१४ या निवडणूक वर्षात तत्कालीन सरकारनेही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाघिणीच्या बछड्यांना पकडण्यासाठी अंजी भागात चार हत्ती, तारेचे कुंपण