लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून याआधी लग्न समारंभाकरता ५० जणांच्या उपस्थिती होती. मात्र, आता ५० नाही तर केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न करावे लागणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक आढळले तर कारवाई करण्यात येईल. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन ही करावे लागणार आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आज रात्री ८ वाजल्या पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये लग्न समारंभाबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
लग्नांसाठी नियम
केवळ २५ जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ होईल
२५ पेक्षा अधिक लोक आढळल्यास परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई
लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक
या नियमांचं उल्लंघन केल्यास, संबंधितांवर कारवाई होणार
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १४४ कायदा लागू करत राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व सेवा बंद राहणार असून. सार्वजनिक वाहतूक जसे रेल्वे, बस या केवळ अत्यावश्यक सुविधेतील कर्मचार्यांसाठी लागू राहतील. यामध्ये रिक्षावाले, फेरीवाल्यांपासून हातावर पोट असणार्या अनेक घटकांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील ७ कोटी नागरिकांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ महिनाभर मोफत दिले जाणार आहे. इतकेच नाही तर गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. रोजी बंद झालीय पण रोटी बंद होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.