संप करनं आंदोलन करनं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार असावा.जेने करुन आपली मागणी लोकशाही मार्गाने सुटावी.पण संपकर्याच्या मागण्याही त्या ताकदीच्या असतील तरच त्यासंपाला महत्व नाहीतर उगाच जनतेचे त्यातून हाल.असो मागणी रास्त त्यास पाठींबा देणे आपले कर्तव्य आहेच. सध्यपरिस्थितीत एसटी कर्मचारी संप करताय.त्यांचा संप हा दर दिवाळीला असतोच पण सरकार त्यावर कायमचा तोडगा काढत नाही अन एसटी कर्मचारी संप पुकारतो अन त्यातून गरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.आज एसटी कर्मचार्यांना खूपच कमी पेंमेंटवर काम करावं लागत.एकी कडे राज्य सरकारी कर्मचार्यांना लाखोने पगार आहे.खरच हे लाख पगार देण्याच्या पात्रतेचे आहेत का हे राज्य सरकारने बघितलं पाहीजे अन पगार मिळताना त्याला कुठतरी मर्यादा असाव्यात. आज शिपायालाही 40 ते 50 हजार पेमेंट आहे.आज ज्याला खरच नौकरीची अन त्या नौकरीतून घर कस चालेल हे बघूनच अन महागाई बघूनच पगार दिला जावा सर्व बाबाींचा विचार करुनच कर्मचार्याचम पेमेंट ठरवावं .
खाजगी कर्मचारी जो कुणीही असो कंपनी त्याला त्याच्या योग्यतेनेच पगार देत असते.योग्यतेपेक्षा कमी पगार मिळत नाही किंवा त्यापेक्षा जास्त तेच धोरण सरकारने राबवाव जेणे करुन सरकारी कामांची गुणवत्ता सुधारेल.अन जनतेला त्याचा लाभ होईल.सेलिब्रिटीच्या मुलानं काय खालं हे मिडीया दाखवते मंत्रीही त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करतात पण एसटी कर्मचारी का संप करतोय हे अजूनही बघितलं जात नाही.तो आत्महत्याही करतोय.पण त्याकडे कुणाचच लक्ष नाही पण सेलिब्रिटीच्या मुलानं आज जेल मध्ये काय खालं याची न्युज होते.
हे दळभद्री महाबिघाडी सरकार कधी एसटी कर्मचार्यांच्या संपाचा तोडगा काढणार हे त्यांनाच माहीत. उलट संपकर्यांवर निलंबनाची तलवार चालवली गेली. एवढ पाप हे सरकार कुठ फेडेल.संपकर्यांच्या रास्त मागण्यांचा सरकार विचार का नाही करु शकलं .