Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा, एसईबीसीच्या उमेदवारांना राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय

वाचा, एसईबीसीच्या उमेदवारांना राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय
, शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:30 IST)
राज्यात पोलिस भरती २०१९ साठी एसईबीसीच्या उमेदवारांना राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जुना आदेश निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
पोलिस भरती २०१९ करता एसईबीसी च्या उमेद्वारांना आपले अर्ज दाखल करताना अडचनींना समोरे जावे लागत होते. ज्या उमेदवारांनी एसईबीसीमधून अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील दि. २३ डिसेंबर २०२०च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही गृहमंत्री देशमुख  म्हटले आहे.
 
येत्या काही महिन्यात राज्यातील पोलीस दलात सुमारे साडेबारा हजार जागा भरण्यात येणार असून, या भरती प्रक्रियेत एसईबीसी आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला होता. यामुळे एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क भरण्याबरोबरच वयोमर्यादाही लागू होणार आहे. पोलिस भरतीत एसईबीसीतील जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने जारी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त