येत्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रदिनापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्यातील उपरोग्य केंद्रांपासून सर्व शासकीय व जिल्हा रुग्णालयांत सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे.तसेच रुग्णांची निशुल्क नोंदणी, मोफत बाह्य व अंतरूग्णाचा उपचार, मोफत चाचणी, तसेच मोफत औषधे दिली जाणार आहे. असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून मुख्यमंत्री शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 3 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली असून या घोषणेची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांतच केली जाणार आहे. या बाबतचे लेखी आदेश आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्ह्यांना दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या घोषणेची अमलबजावणी येत्या स्वातंत्र्य दिनापासून होणार आहे. त्या साठी जिल्हा आणि तालुकास्तरावर सनियंत्रण समितीतीचे गठन करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. ही समिती दरमहा या रुग्णालयांचा आढावा घेणार असून हे उपचार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक केंद्र, उपकेंद्र, जिल्हा व उप जिल्हा रुग्णालयासाठी लागू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, महापालिकेच्या रुग्णालयांना या पासून वगळले आहे.