Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना लसीकरणात राज्याची विक्रमी कामगिरी

कोरोना लसीकरणात राज्याची विक्रमी कामगिरी
, शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (22:27 IST)
करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी  ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.
 
२१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज (दि. ४ सप्टेंबर) झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
 
लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम-
महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींच्या मात्र देण्यात आल्या असून, त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
 
कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केले०५?ल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ४ हजार १३० नवीन करोनाबाधित