Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारण्याची अट शिथिल

stateelection commission maharashatra
, शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (09:53 IST)
राज्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याला परवानगी दिली आहे. या निर्णयाचे ग्रामीण भागातील इच्छूकांनी स्वागत केले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी देखील ऑनलाइन अर्ज भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. याआधी राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वारंवार प्रयत्न केल्यानंतरही निवडणूक आयोगाचे संबंधित संकेतस्थळ सुरू झाले नाही. त्यामुळे इच्छुकांना अर्ज दाखल करता आले नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रीय ग्रामीण ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन