Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके, ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके, ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
, गुरूवार, 20 जानेवारी 2022 (16:36 IST)
नागपूरात एका हृदयविदारक घटनेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी जवळ भारकस येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे जिल्हा परिषदेविरोधात संताप पसरला आहे.
 
पाच दिवसांपूर्वी चार वर्षांची अंजली दुपारी घराजवळ खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे चिमुरडी खाली पडली आणि जोरजोरात किंचाळू लागली. तोपर्यंत कुत्र्यांनी तिच्या कमरेचे, पाठिचे आणि पायाचे लचके तोडले. 
 
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्यामुळे सुरुवातीला गावाजवळच्या टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाला.
 
या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांची दहशत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गावातील मुलांवर आणि लोकांवर कुत्र्यांनी अनेकवेळा हल्ले केले आहेत. ग्रामपंचायत, पोलीस, जिल्हा परिषदेकडे तक्रारी करुनही लक्ष देत नसल्यामुळे गावकरी संतापले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता ठाणे पोलिसांनी कालीचरण महाराजांना अटक केली