Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रत्नागिरीत एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा सुटला?

msrtc-st-bus-strike-in-maharashtra
, सोमवार, 11 एप्रिल 2022 (22:11 IST)
रत्नागिरीत विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील 4 महिन्यांपासून चालणारा एसटी कर्मचाऱयांचा संप आता संपुष्टात आला आह़े न्यायालयाच्या निर्देशानुसार आता 22 एप्रिलपर्यंत कर्मचारी कामावर हजर होणार आहेत, असा निर्णय संपकरी कर्मचाऱयांकडून घेण्यात आला आह़े त्यामुळे एसटी बंदमुळे हाल होत असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळणार आह़े
 
विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचा ‘अल्टीमेटम’ दिला होत़ा अन्यथा राज्य सरकार आपल्या नियमांनुसार कारवाई करू शकते, असे सांगितले होत़े यामुळे कर्मचाऱयांकडून कामावर हजर होण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े 7 एप्रिल रोजी संपासंदर्भात न्यायालयाचा निर्णय येताच निकाल आपल्या बाजूने लागल्याचे सांगत एसटी कर्मचाऱयांकडून रत्नागिरी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलनाला असलेल्या कर्मचाऱयांकडून जल्लोष करण्यात आल़ा
 
एसटी संपाचा परिणाम प्रवाशांबरोबर टपाल सेवेवरही बसला होत़ा त्याचप्रमाणे दहावी व बारावी परीक्षेलाही काही प्रमाणात फटका बसल़ा उत्तरपत्रिका वेळेत पोहचण्यास विलंब झाल्याने शिक्षकांना पेपर तपासणीसाठी वेळ वाढवून देण्यात आला आह़े दरम्यान ऐन लग्नसराईत एसटीचा संप मागे घेण्यात आल्याने व्यापारी मंडळींमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आह़े वाहतूक मंदावल्याने बाजारपेठांवर परिणाम झाला होत़ा
 
मागील चार महिन्यांपासून एसटीच्या संपामुळे मोठे नुकसान एसटी महामंडळाला सहन करावे लागल़े दिवसाला सुमारे 70 लाख रूपये याप्रमाणे 150 दिवसात कोटय़वधीचा तोटा सहन करावा लागल़ा जिह्यात संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱयांविरूद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात आली आह़े आता या कर्मचाऱयांना कामावर घेण्यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय पाहून पुढील कार्यवाही करणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आल़े आतापर्यंत एसटीच्या 185 कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले आह़े तर 237 जणांवर सेवासमाप्तीची कारवाई रत्नागिरी विभागाकडून करण्यात आली आह़े त्यातील 60 कर्मचारी हे यापूर्वीच कामावर हजर झाल्याचे सांगण्यात आले.
 
रत्नागिरी विभागात सुमारे 4 हजार एसटी कर्मचारी आहेत़ त्यापैकी 1 हजार 200 कर्मचारी हे कामावर हजर राहिले आहेत़ तर अडीच हजारहून अधिक कर्मचारी येत्या काही दिवसांत कामावर हजर होणार आहेत. असे असले तरी पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होण्यास कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आह़े.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता कुठल्याही क्षणी सुरू होणार भारनियमन; भर उन्हाळ्यात वीज टंचाईचे संकट