Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर: परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

Suicide
आयआयआयटी नागपूर येथील एका २० वर्षीय विद्यार्थ्याने कथितरित्या आत्महत्या केली आहे. मृत श्रेयस चंद्रकांत माने (२०) हा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.

मिळालेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थ्याची ओळख आयआयआयटी नागपूर येथील कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग (सीएसई) च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी, २० वर्षीय श्रेयस माने अशी पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संस्थेमध्ये सोमवारी४ मे परीक्षा सुरू होणार होत्या. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास श्रेयशने वसतिगृहाच्या छतावरून उडी मारली. श्रेयश मूळचा महाराष्ट्रातील कोल्हापूरचा असल्याचे वृत्त आहे.
ALSO READ: बद्रीनाथ धाम येथे हृदयविकाराच्या झटक्याने महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू
पोलीस ठाण्यात 'अपघाती मृत्यू' म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैक्षणिक दबाव आणि वैयक्तिक कारणांसह सर्व संभाव्य बाबींचा पोलीस कसून तपास करत आहे. सहायक निरीक्षक निलेश चोरे यांनी सांगितले की, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आणि आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.
ALSO READ: सुनेत्रा पवार देशातील 'नंबर वन' आमदार बनल्या, सर्वाधिक मते मिळवणाऱ्या आमदार बनण्याचा मान मिळवला
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुनेत्रा पवार देशातील 'नंबर वन' आमदार बनल्या, सर्वाधिक मते मिळवणाऱ्या आमदार बनण्याचा मान मिळवला