Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत कॉपी करताना पकडल्यावर विद्यार्थिनीची आत्महत्या

suicide
, बुधवार, 12 एप्रिल 2023 (16:19 IST)
राज्यात शाळांमध्ये परीक्षा सत्र सुरु असताना चेंबूर मध्ये राहणाऱ्या एका मुलीला परीक्षेत कॉपी करताना शिक्षकाने पकडल्यावर नैराश्यातून 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे.चेंबूर मध्ये कॅम्पच्या इंदिरानगर परिसरात 16 वर्षाची इयत्ता नववीत शिकणारी मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहते या मुलीची परीक्षा सुरु असताना मंगळवारी पेपर सोडवताना तिच्या कडे कॉपी सापडली शिक्षकांनी तिला जाब  विचारला आणि मुलीच्या आईला शाळेत बोलावून घेतले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. घडलेल्या प्रकारामुळे मुलीने नैराश्यात येऊन राहत्या घरी गळफास लावून आपले आयुष्य संपविले. तिला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत  घोषित केले . पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.मयत मुलीच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.      

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2023 CSK vs RR : राजस्थानसमोर चेन्नईचा पराभव करण्याचे आव्हान, धोनी करणार बदल