Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थ्यांना 10 मिनिटं अधिकची मिळणार, महाराष्ट्र शिक्षण बोर्डाचा निर्णय

exam
, बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (20:54 IST)
राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा  पुढच्या आठवड्यापासून सुरु होत आहे. या परीक्षेतील प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटं अधिकची मिळणार आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक आणि शिक्षकांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
 
कोरोनानंतर पहिल्यांदाच दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा ऑफलाईन होत आहे. यापूर्वी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत पेपर सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत केल्या जात होत्या. यावेळात विद्यार्थ्यांचा रोल नंबर, केंद्र क्रमांक आणि इतर तपशील नोंदवला जात होता. मात्र या दहा मिनिटांच्या वेळेत कॉपी होण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात घडत होते. मात्र परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सरकारने यंद कॉपीमुक्त परीक्षा अभियान सुरु केलं आहे. यामुळे पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिक 10 मिनिटं आधी देण्याचा नियम बदलून परीक्षा सुरू झाल्यानंतरच प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी मिळणारी 10 मिनिटं कमी झाली.
 
बोर्डाच्या या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी अशी मागणी केली की, बोर्डाकडून प्रश्नपत्रिकेसाठी आता 10 मिनिटं दिली जात नाही, यामुळे विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचं नुकसान होत आहे. यामुळे पेपर संपल्यानंतर अधिकची 10 मिनिटं बोर्डाने वाढवून द्यावी. अखेर बोर्डाने ही मागणी मान्य करत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर अधिकची 10 मिनिटं वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही 10 मिनिटं वाढवून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक सुधारित परिपत्रक जारी केलं आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कावेरी नदीत बुडून चार विद्यार्थिनींचा मृत्यू