Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बुधवार पासून मिळणार हॉल तिकीट

बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बुधवार पासून मिळणार हॉल तिकीट
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (18:02 IST)
मार्च- एप्रिल 2022मध्ये होणारी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उद्यापासून महाविद्यालयात उपलब्ध होणार. इयत्ता बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. बारावीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान ऑफलाईन होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या बाबत प्रसिद्धी पत्रक दिले असून या पत्रकात नमूद केले आहे की या हॉल तिकीटाची प्रत ऑनलाईन डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यपकांची सही व शिक्का घेऊन विद्यार्थ्यांना दिली जावी असे सांगण्यात आले आहे. हे हॉल तिकीट  उद्या बुधवार पासून महाविद्यालयांना मंडळाच्या संकेत स्थळ www.mahasscboard.in वरून डाउनलोड करून मिळतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरुणाचल प्रदेश: हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू, सर्वांचे मृतदेह सापडले