महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत येत्या 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. मात्र त्याआधी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले गेले आहे. यापूर्वी अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता.
या निर्णयानुसार बोर्डाने परीक्षा केंद्रांना आदेश दिले आहे की उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा अशात परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या पेपरला मुकावे लागू शकते.
21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतल्या जाणार आहे. या हिशोबाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजता तर दुपारी 2.30 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असेल. मंडळाने या संदर्भातील पत्र सर्व शाळांना पाठवले आहेत.
उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याशिवाय मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती मात्र आता त्यात बदल करण्यात आले आहे.