Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

सोलापुरात अशी अंमलबजावणी आहे लसीकरणाची

Such is the implementation of vaccination in Solapur
, सोमवार, 13 डिसेंबर 2021 (07:43 IST)
सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप, बँक, वाईन शॉप, मॉल्स शासकीय कार्यालयांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळतं आहे. याची काटेकोर अंमलबजावणी न करणाऱ्या विरोधात सोलापूर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.
 
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेले आहेत. आत्तापर्यंत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांकडून 04 हॉटेल,10 वाईन शॉप्स,02 पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आलेली आहे.
 
या नियमांचं पालन न करणाऱ्या 1 हजार 408 व्यक्तींना दंड देखील थोठवण्यात आला आहे.त्यामुळे लसींचे दोन्ही डोस न घेतलेल्या सोलापूरकरांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक; परीक्षा पुढे ढकलल्याने भाजप नेते आक्रमक