Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात अशा झाल्या आहेत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

maharashtra police
, गुरूवार, 21 एप्रिल 2022 (08:32 IST)
महाराष्ट्रात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पदोन्नती देत बदली करण्यात आल्या आहेत. नाशिकचे वादग्रस्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना साइड पोस्टिंग देत विशेष पोलीस महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग येथे बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे यांनी सध्याच्या विद्यमान पदावरून बदली हवी असल्याचे यापूर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विनंती अर्ज केला होता.
 
मुंबईत देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विद्यमान पोलीस उपमहानिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लखमी गौतम यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना पोलीस महासंचालक या पदावर करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईतील पश्चिम प्रादेशिक विभागातील अप्पर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची पुणे शहर सह पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
 
अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक सत्यनारायण यांची विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा बदली केली आहे.
 
अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबईतील प्रवीणकुमार पडवळ यांची बदली मुंबईतच सहपोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखा महत्त्वाचा विषय गाजत असून पदोन्नतीच्या माध्यमातून पडवळ यांना बदली करण्यात आली आहे.
 
नाशिक पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या जागी जयंत नाईक नवरे यांची बदली करण्यात आली आहे. 
 
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची देखील बदली करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली करत साइड पोस्टिंग असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा येथे बदली केली आहे तर दुसरीकडे मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवाचे पदी असलेले अंकुश शिंदे यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
 
विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आला असून सुहास वारके यांची आता नियुक्ती सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मुंबई येथे करण्यात आली आहे तर दुसरीकडे या पदावर आधी असलेले मिलिंद भारंबे यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य या पदावर बदली केली गेली आहे
 
संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता.. या संपूर्ण घटनेची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती.. त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एका दिवशी दोन बालविवाह रोखले