Publish Date: Sat, 29 Oct 2016 (09:47 IST)
Updated Date: Sat, 29 Oct 2016 (09:49 IST)
नाशिक जिल्ह्यातील लासलगावपासून जवळच असलेल्या मानोरी येथील शेतकर्यांने कर्जाला कंटाळून घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मानोरी येथील कृष्णा उर्फ बापु भिमा संभेराव (30) या युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विंचुर चे तीन लाख एकाहत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज होते.कर्जाला कंटाळून या युवा शेतकर्यांने असा पाऊल उचलल्याचे समजत आहे.