Publish Date: Fri, 01 Apr 2022 (13:02 IST)
Updated Date: Sun, 02 Oct 2022 (21:52 IST)
अमरातवीत एक धक्का दायक माहिती समोर आली आहे. परीक्षा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर काढून घेतला. या प्रकारानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तसा आरोप कुटुंबियांनी लावला आहे.
परीक्षा फी भरली नाही म्हणून त्याच्या हातून परीक्षेचा पेपर हिसकावून घेतला. वर्ष वाया जाणार या भितीने आमच्या मुलाने ग्ळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणार्या मुलाचे नाव अनिकेत अशोक निरगुडवार आहे. हा धक्कादायक प्रकार वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीमध्ये घडला आहे. वडिलांनी महाविद्यालयाविरोधात बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.