पोलीस अधिकाऱ्याने घेतला मुख्यालयात गळफास, सर्वत्र खळबळ

शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (16:25 IST)
पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ रायगड येथे उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी आत्महत्या केली आहे. करणेरकर यांची तीन महिन्यांपूर्वीच अलिबाग इथे नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गळफास घेतल्याने जिल्हा पोलीस दल हादरले आहे. कणेरकर यांनी आत्महत्या का केली हे अजून तरी समोर आले नाही.
 
तीन महिण्यापुर्वी कणेरकर हेमुंबई येथून अलिबागला बदली होऊन रुजू झाले, अलिबाग इथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर त्यांनी रजा घेतली होती. नंतर 15 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर आले होते. मात्र 16 ऑगस्टला रात्री आठ वाजता ते पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गेले आणि त्यांनी गळफास घेतला आहे.
 
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली हे अस्पष्ट आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख गणपतीपुळे: समुद्रात बुडून तिघांचा मृत्यु