राज्यामध्ये 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे. शिक्षण संचालकांनी असे आदेश काढले आहेत. तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात 15 जून पासून होईल. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्टी लागणार आहे.
शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांना साधारण 2 मे पासून सुट्टी लागणार आहे. तर नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु होईल. अनेक शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहे यामुळे विध्यार्थ्यांना कधीपासून सुट्टी द्यायला हवी हा निर्णय घ्यावा हे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष विदर्भ सोडून 15 जून पासून सुरु होणार आहे. दरवर्षी विदर्भ उन्हाने खूप तापतो. यावर्षी उन्हाची तीव्रता देखील जास्त असल्यामुळे विदर्भात शाळा या 1 जुलै पासून सुरु होणार आहे. कारण 30 जूनला रविवार असल्याने 1 जून पासून शाळा सुरु होतील.
Edited By- Dhanashri Naik