पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांना तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला आहे. विनापरवाना डोंगराचं सपाटीकरण केल्याने हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली. तसंच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले आहेत. याआधी सरकारने आयोजकांकडून करमणूक करापोटी 1 कोटी 77 लाख रुपयांची वसुली केली आहे.