राज्याच्या दौऱ्यादरम्यान आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार नी पुणे ग्रामीण येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. तसेच, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
सत्ता मिळाली तर त्याचा उपयोग जनमानसासाठी करायला हवा पण आताचं सरकार तसं काम करताना दिसत नाही. राज्य सरकारने कर्जमाफी केली मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी ही कर्जमाफी आहे. बळीराजाला येत्या काळात सुख मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा. आघाडी सरकारच्या काळात कामं झाली पण ते सागण्यात आलं नाही. या सरकारने त्याचाच फायदा घेत डाव साधला व खोटं बोलून सत्तेवर आले. आता कार्यकर्त्यांनी २०१४ मध्ये जे झालं ते विसरून जावं, आता आपलं लक्ष फक्त २०१९ आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं, असं आवाहन तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणूका लागतील तेव्हा लागतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्पर रहावं. पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी कामगिरी पार पाडायची आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.