Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चोरटे प्रवासी सुपरफास्ट तेजस रेल्वेतील हेड फोन चोरले

चोरटे प्रवासी सुपरफास्ट तेजस रेल्वेतील हेड फोन चोरले
भारतीय लोकांना कितीही चांगले दिले तरी ते काहीतरी घाण करताच. असाच विचित्र प्रकार तेजस या नवीन सुपर फास्ट रेल्वेसोबत घडला आहे. 
 
मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या सुपरफास्ट, हायटेक तेजस एक्स्प्रेसवर प्रवाशांनीच चोर्य केले आहे.  यामध्ये  हेडफोन्स चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.  त्यामुळे या भिकार प्रवासी वर्गावर रेल्वे चांगलीच नाराज झाली आहे.तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी प्रवासात वापरण्यासाठी दिलेले हेडफोन्स परत करण्याचीही तसदी घेतली नाही. एलईडी स्क्रीन्सचंही नुकसान केले आहे. दुसरा परवा होता तेव्हा अनेक प्रवासी वर्गाने हेडफोन मागितले तेव्हा पहिल्या प्रवासात हे सर्व चोरीला अर्थात प्रवासी घेवून गेले हे उघड झाले आहे.मुंबई-गोवा हे 552 किमीचं अंतर आठ ते नऊ तासात पार करणारी तेजस एक्स्प्रेस जमिनीवरील सर्वाधिक आधुनिक असा प्रवास आहे. रेल्वे आता अनेक गोष्टी बाद करण्याच्या मानसिकतेत गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिजित, सोनू नंतर आता परेश रावल सुद्धा