Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री सक्षमपणे चालवत नाहीत - सुप्रिया सुळे

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री सक्षमपणे चालवत  नाहीत - सुप्रिया सुळे
राज्यात पोलीसच असुरक्षित आहेत तिथे सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री सक्षमपणे चालवत नसून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे व सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष होत असल्याचे ताशेरे त्यांनी ओढले आहेत.रा

ज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचीच सत्ता आहे. पण, प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा वचक नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं आहे. पण, त्यांचा प्रशासनावर वचक नाही. यापूर्वी देखील अनेक मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलेली आहे. पण, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मात्र अपयशी ठरल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

यापूर्वी देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंलं होतं. पण, आता महिला सुरक्षेवरून देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सात वर्षाच्या चिमुरड्याने खेळण्याच्या वयात वर्षभरात 22 मिलियन डॉलर कमावले