कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली उड्डाण सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केले आहे. परंतु, महाराष्ट्रामध्ये मात्र उड्डाण सेवा पुढची सूचना मिळेपर्यंत बंदच राहणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विमान सेवेवर स्थगिती कायम राहणार आहे. येत्या 25 मेपासून देशात एअर इंडियासहीत अनेक विमान कंपन्यांनी देशांतर्गत सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे.