Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाणीपट्टी दरवाढ व मलजल उपभोक्ता शुल्काला स्थगिती; नाशिककरांना दिलासा…

Nashik Mahanagar palika
, मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (08:42 IST)
महानगरपालिकेने स्थायी समितीच्या सभेत घेतलेला पाणीपट्टी दरवाढीचा व मलजल उपभोक्ता शुल्क आकारणीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच नाशिककरांना पाणीपट्टी आकारली जाईल, नाशिककर जनतेची मागणी व त्यांच्या भावनांचा विचार करता हि दरवाढ रद्द करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिली आहे. या निर्णयाबाबत पालकमंत्री आणि मनपा आयुक्त यांच्यांत या बाबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस कर उपायुक्त श्रीकांत पवार उपस्थित होते.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तरुणींनी भररस्त्यावर रिल्स बनवणाऱ्या तरुणाला दिली ‘ही’ शिक्षा !