Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सप्तशृंगी देवी मंदिर सलग 45 दिवस बंद ठेवणे संशयास्पद

devi saptshringi
, शुक्रवार, 15 जुलै 2022 (12:55 IST)
सप्तशृंगी गडावर देवीचे मंदिर येत्या 21 जुलैपासून सुमारे दीड महिना बंद ठेवण्याच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयाला भाविकांनी हरकत ्यास सुरूवात केली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत मंदिर बंद ठेवून देवस्थान नक्की काय करणार, याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे आता याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण भारतामध्ये आदिशक्तीचे 51 शक्तीपीठ आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ मानले जातात. त्यापैकी सप्तश्रृंगी निवासीनी देवी या शक्तीपीठाला महत्त्व आहे. संपूर्ण भारतामधून देवीचे भक्त सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनाला येत असतात. देवस्थानने 45 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये कुठलिही स्पष्टता देवस्थान ट्रस्टने केलेली नाही.
 
फक्त एक साधे पत्रक काढून मंदिर बंद ठेवणेविषयी माहिती दिली. त्यामुळे देवींच्या भक्तांत संभ्रमावस्था आहे. मंदिर बंद ठेवण्याच्या काळात देवस्थान भगवतीच्या मुळ मुर्तीत काही बदल करणार आहेत का, वज्रलेप करण्याचा काही निर्णय घेण्यात आलेला आहे का, असा सवाल करीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे शरद पवार,अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय