Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वाध्याय परिवाराच्या निर्मलाताई आठवले यांचे निधन

स्वाध्याय परिवाराच्या निर्मलाताई आठवले यांचे निधन
, मंगळवार, 31 जानेवारी 2017 (15:40 IST)
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी श्रीमती निर्मलाताई आठवले (ताई) यांचे  सोमवारी ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी  दु:खद निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या.

निर्मलाताईंचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ रोजी राजापूर तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यानंतर निर्मलाताईंनी स्वत:ला स्वाध्याय कार्यात वाहून घेतले. स्वाध्याय कार्यात निर्मलाताईंचं योगदान मोठे होते . स्वाध्याय परिवारामध्ये त्या ‘ताई’ म्हणून ओळखल्या जात. पांडुरंगशास्त्रींच्या निधनानंतर निर्मलाताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातच वास्तव्याला होत्या. तिथं त्या स्वाध्याय परिवारातील  बंधु-भगिनींना मार्गदर्शन करत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षणावर २७ फेब्रुवारीला सुनावणी