नेमबाज स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवून देशाची शान वाढवली आहे. 28 वर्षीय स्वप्नीलने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तसेच स्वप्नीलने गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
नेमबाज स्वप्नील कुसळे हा सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागात टीसी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसाठी ही अभिमानाची बाब आहे. मध्य रेल्वेने ही घोषणा केली आहे की, स्वप्नील पॅरिसहून भारतात आल्यावर भारतीय रेल्वेकडून त्याचा आदर केला जाईल आणि त्याला अधिकारी म्हणून त्वरित बढती दिली जाईल. स्वप्नीलला रेल्वेमंत्री रोख बक्षीसही जाहीर करणार आहेत.