Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पालासाठी समिती!

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पालासाठी समिती!
चंद्रपूर जिल्‍हयातील ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला जागतीक दर्जाचे पर्यटन स्‍थळ करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनविभागाच्‍या सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली एक समिती गठीत करण्‍यात यावी व या समितीने या विषयाचा सखोल अभ्‍यास करून येत्‍या तीन आठवडयात आपला अहवाल सादर करण्‍याचा सुचना वित्‍त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.
 
दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्‍या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरील निर्देश दिले. ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला जागतीक दर्जाचे पर्यटन स्‍थळ करण्‍याच्‍या दृष्‍टीने सॉलिमर इंटरनॅशनल या कंपनीच्‍या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक सर्जन भगत, ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाचे मुख्‍य वनसंरक्षक श्री. गरड, सहसचिव श्री. महाजन, अपर प्रधान मुख्‍य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्‍यासह वरिष्‍ठ वनाधिका-यांची उपस्थिती होती.
 
सॉलिमर इंटरनॅशनल या कंपनीने याआधी अमेरिका, मेक्‍सीको, आफ्रीका, मलेशिया, सिंगापूर येथील वन्‍यजीव प्रकल्‍पांसाठी काम केले आहे. ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला जागतीक दर्जाचे पर्यटन स्‍थळ करण्‍याच्‍या दृष्‍टीने एक प्रकलप अहवाल त्‍यांनी या बैठकीत सादर केला. यात व्‍याघ्र संख्‍येत वाढ करणे, रोजगाराची उपलब्‍ध करणे आदी बाबींचा प्रामुख्‍याने समावेश आहे. निसर्ग समुपदेशन केंद्र, उपहारगृह, व्‍याघ्र तसेच वन्‍यजीवांबद्दल माहिती देणारे केंद्र, मनोरंजन व इतर सुविधा कशा उपलब्‍ध करण्‍यात येईल याबाबतचा विस्‍तृत उल्‍लेख या अहवालात अंतर्भुत आहेत. सदर अहवालाचा सखोल अभ्‍यास वनसचिवांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने करून येत्‍या तीन आठवडयात अहवाल सादर करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॅशलेस व्यवहारासाठी IndiaQR मोड सुरु