चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. 1 जुलै पासून 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी ताडोबा प्रशासनाने वन्यजीव प्रेमींची मागणी आणि एनटीसीएच्या गाईडलाईन्स नुसार ताडोबा प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवावा असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. मात्र या प्रस्तावावर कुठलाच निर्णय न झाल्यामुळे ताडोबा प्रशासनाने 1 जुलैपासून ताडोबा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. ताडोबाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पर्यटकांसाठी पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे अचानक ताडोबा बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.