Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पापाची जबाबदारी घ्या आणि राजीनामा द्या -सुषमा अंधारे

Sushma Andhare
, बुधवार, 19 एप्रिल 2023 (22:26 IST)
महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. आज त्या कोल्हापुरात बोलत होत्या.
 
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, अप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करावा आशा सूचना केल्या असतील मात्र त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे.मृतांचा आकडा लपवला गेला आहे. 100 हुन अधिक मृत झाले असावेत. 16 कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून पेंडाल का उभे केले नाही. आरोग्य विभागाला अगदी शेवटच्या वेळी कार्यक्रमाची कल्पना दिली गेली. स्वतंत्र रुग्णवाहिकेचा मार्ग केला नाही. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला असा आरोपसुषमा अंधारे यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात