जिल्ह्यातील चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात झाला. केमिकल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यानं टँकर पलटी झाली. या अपघातात 2 जण ठार झाले आहे तर 2 जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा मार्गावर ही घटना घडली.
अपघातग्रस्त टँकर मुंबई येथून केमिकल्स घेऊन धुळ्याकडे जात असताना हा अपघात घडला. केमिकल्स घेऊन जाणारा मोठ्या टँकरला भरधाव ट्रकने मागून जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टँकरचे नियंत्रण सुटले आणि महामार्गावरच पलटी झाला. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे काही कळायच्या आत टँकरला आग लागली.
त्यामुळे घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. दोन्ही टँकर महामार्गावर पलटी झाले होते. समोरील टँकर हा डिव्हायडर्स तोडून दुसऱ्या बाजूच्या महामार्गावर जाऊन पलटी झाला होता. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवि टँकर मध्ये ज्वलनशील पदार्थ होते. मात्र वेळीच आग विझवण्यात असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक 3 तास ठप्प झाली होती. खबरदारी म्हणून वाहनं लांब थांबवण्यात आली होती. जखमी व्यक्तींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अथक प्रयत्नानंतर दोन्ही वाहनं महामार्गावर बाजूला करण्यात आले, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.