श्रीरामपूरच्या सराला बेटचे प्रमुख रामगिरी महाराजांनी पैगंबरां विषयी वादग्रस्त विधान केले. मुस्लिम समाजाने रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी घेत रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पांचाळे गावात रामगिरी महाराजांचे प्रवचन ठेवण्यात आले असून या वेळी त्यांनी पैगंबरां विषयी वादग्रस्त विधान दिले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर या प्रकरणी पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात छत्रपती संभाजीनहरच्या वैजापूर आणि नाशिकच्या येवला येथे गुन्हा दाखल केला आहे.
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर त्यांच्या विरोधात निर्दशने व आंदोलन कऱण्यात आले या काळात सर्व दुकाने बंद करण्यात आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांनी आश्वासन दिल्यावर लोक परत गेले.
या वर प्रतिक्रिया देताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, बांग्लादेशात जो काही प्रकार घडला तो आपल्या देशात घडू नये. हिंदूंनी मजबूत राहायला हवं अन्याय करणारा अपराधी तर असतो पण अन्याय सहन करणारा देखील अपराधी असतो असे महंत रामगिरी महाराज म्हणाले.