Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

15 सप्टेंबरपासून ठाकरे सरकारची खास मोहीम

15 सप्टेंबरपासून ठाकरे सरकारची खास मोहीम
, शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (13:22 IST)
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे.
 
येत्या १५ सप्टेंबरपासून मोहिमेला सुरूवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलताना दिली. या मोहिमेअंतर्गत आरोग्य स्वयंसेवक राज्यातील सुमारे सव्वा २ कोटी कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करणार आहेत.
 
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे.
 
येत्या १५ सप्टेंबरपासून मोहिमेला सुरूवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलताना दिली. या मोहिमेअंतर्गत आरोग्य स्वयंसेवक राज्यातील सुमारे सव्वा २ कोटी कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करणार आहेत.
 
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचा समावेश आहे.
 
ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) दिली. लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग यात असणार आहे. ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
 
आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना काळात पावसाळी अधिवेशनाच्या गर्दीचं शासनापुढे आव्हान