rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अदानींचे खिसे भरण्यासाठी बजेट,उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला

uddhav thackeray
, सोमवार, 10 मार्च 2025 (21:18 IST)
महायुती सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प आज महाराष्ट्र विधानसभेत सादर करण्यात आला. अजित पवार यांनी एकूण 7 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्ष महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत आणि अर्थसंकल्पावर टीका करत आहेत.

शिवसेना (उद्धव ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प "पूर्णपणे निरुपयोगी" असल्याचे म्हटले आणि महायुती सरकारवर कल्याणकारी आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, महिला लाभार्थ्यांसाठी मासिक देय रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याबाबत काहीही सांगितले नाही.
 
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा पूर्णपणे निरुपयोगी अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारने अनेक आश्वासने दिली होती, परंतु त्यापैकी एकाही आश्वासनाला या अर्थसंकल्पात स्थान मिळालेले नाही.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या मेट्रो लाईनच्या बांधकामावरही ठाकरे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, जर विमानतळांचे व्यवस्थापन अदानी समूह करत असेल, तर महाराष्ट्र सरकार त्यांना जोडणारी मेट्रो लाईन बांधण्यासाठी करदात्यांच्या पैशाचा वापर का करत आहे? मेट्रो लाईनच्या बांधकामाचा खर्च अदानी ग्रुपने उचलावा.असे ते म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर समुद्रात मोठी दुर्घटना, दोन जहाजांची धडक 23 जणांचा मृत्यू