ठाण्यात एका व्यक्तीने टोपलीतील एक केळी जास्त उचलल्यामुळे फळ विक्रेताशी वाद झाला आणि रागाच्या भरत येऊन फळविक्रेताने लोखंडी रॉडने ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी फळविक्रेताला आणि त्याच्या मुलाला अटक केळी आहे.
एका 27 वर्षीय तरुणाने आणि त्याच्या मित्राने शनिवारी भिवंडीच्या रस्तावरील फळविक्रेतांकडून डझनभर केळी विकत घेतली आणि त्याचे पैसे दिले. मात्र त्या पीडित व्यक्तीने टोपलीतील 1 केळी उचलली. त्यावरून फळ विक्रेता आणि पीडित व्यक्तीत वाद सुरु झाला. पीडित व्यक्तीने त्या अतिरिक्त केळीचे पैसे देण्याचे ऑफर करून देखील फळ विक्रेत्याने रागाच्या भरात येत पीडित व्यक्ती आणि त्याच्या मित्राला लोखण्डी रॉड ने बेदम मारहाण केळी. आणि धमकावले. असं नारपोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
पीडित पैकी एकाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा फळ विक्रेत्यांवर भारतीय दंडाच्या कलाम 307 कलम 323, कलम 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.