मुंबईतील ठाणे येथे अमली पदार्थांची तस्करी प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. पोलिसांना बघून आरोपीने एका इमारतीतून पळून जात असताना आरोपी इमारतीच्या 10 व्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली लटकला त्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी मदत केली आणि त्याचा जीव वाचवला नंतर त्याला अटक केली. इमारतीच्या खाली त्याला पकडण्यासाठी जाळी लावण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा आरोपी गेल्या सात महिन्यांपासून फरार होता. या प्रकरणी मिळालेल्या माहितीवरून हैदराबाद पोलीस अटक वॉरंटसह आरोपीला अटक करण्यासाठी ठाण्यातील मीरा रोड परिसरात पोहोचले होते. ही कारवाई करण्यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर मीरा रोड परिसरातील एका इमारतीच्या 10व्या मजल्यावरील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये आरोपी सापडला .
पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला त्याने फ्लॅटच्या बाल्कनीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो बाल्कनीच्या ग्रीलला लटकून गेला पोलिसांनी त्याला गोष्टीत अडकवून ठेवले नंतर त्याला हात देत वर ओढले. खबरदारी म्हणून अग्निशमन दल देखील बोलावले होते .पोलिसांनी त्याला शांत करत वर ओढले आणि त्याला अटक करून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.