Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाणे : काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद

ठाणे : काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद
, शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:20 IST)
ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आज रात्री १२ ते उद्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
 
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे. 
 
दुसरीकडे धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात केली असताना आता भातसा धरणातील पाणी पुरवठ्यावरही निर्बंध आले आहेत. भातसातून ठाणे शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून त्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले असून ही कपात दररोज न करता आठवड्यातून एक दिवस करावी, अशी मागणी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

500 किलो वजनाची कढई भरीत महोत्सवात जागतिक विक्रमासाठी 2500 किलो भरीत तयार होणार