Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ती लिस्ट पूर्णपणे चुकीची, चौकशी करण्यात येणार, वळसे पाटील यांची माहिती

webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (15:05 IST)
राज्यातील पोलीसांच्या बदल्या करण्यात आली असल्याची यादी व्हायरल होत आहे. समाजमाध्यमांवर या व्हायरल झालेल्या यादीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही देखील नाही. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वळसे पाटील म्हणाले की, सध्या बदल्यांचा कोणताही प्रस्ताव नाही. ती जी लिस्ट व्हायरल झाली आहे. ती पूर्णपणे चुकीची असून खोडसाळपणाने करण्यात आली आहे. याची चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
 
राज्य सरकारमध्ये ६ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एक यादी व्हायरल झाली होती. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. तसेच वर्षापूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजासारखा आवाज काढून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना केली होती. परंतु अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करण्यात आला होता. यानंतर अज्ञात व्यक्तीने फोन केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bike Buying Tips: या सर्वोत्कृष्ट मायलेज देणार्‍या बाईक आहेत, बजेटच्या दृष्टीनेही सर्वोत्तम