Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण
, सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:12 IST)
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणार्‍या रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याने पारनेरच्या कोठडीत मोबाइलचा वापर केल्याचेउघड झाले होते.या प्रकरणी त्याच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याने आता दोषारोपपत्र दाखल झाले आहे.पारनेर पोलिसांनी ही माहिती दिली.
 
बोठेविरुद्ध नगर शहरात खंडणी आणि विनयभंगाचेही गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणांचा तपास सुरू आहे. दरम्यान, रेखा जरे खून प्रकरणी जामीन अर्जावर जिल्हा न्यायालय आज (सोमवारी) निर्णय देणार आहे.अटक आरोपी बाळ बोठे हा पारनेर येथील कोठडीत आहे.या न्यायालयीन कोठडीत मोबाइल आढळून आला होता. यानंतर उपअधीक्षक अजित पाटील,पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कारागृहाची झडती घेतली असता याच कोठडीत दुसर्‍या गुन्ह्यातील एका आरोपींकडे दोन मोबाइल सापडले होते.आरोपींनी हे मोबाइल पाईपमध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता बोठे यानेही वकिलाशी संपर्क करण्यासाठी त्या मोबाइलचा वापर केल्याचे निष्पन्न झाले.
 
नंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला.तपास पूर्ण झाल्यानंतर आता सर्व आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.दरम्यान,रेखा जरे खून प्रकरणी यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल असून जामीनासाठी बोठेने अर्ज केला आहे.त्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय 20 सप्टेंबरला निकाल देणार आहे.
 
दरम्यान, रेखा जरे खून प्रकरण उजेडात आल्यानंतर या गुन्ह्यापूर्वी घडलेल्या दोन घटनांचे गुन्हेही बोठेविरुद्ध दाखल करण्यात आले.यामध्ये महिलेने विनयभंगाची तर दुसर्‍या महिलेने नोकरी टिकविण्यासाठी खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे.या महिलांच्या तक्रारीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणांचा तपास अजूनही सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाळेत न जाता खेळत-खेळत थेट शेततळ्यात गेलेल्या 3 मुलांचा मृत्यू