बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा तलावात अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी नर्सचा मृतदेह सापडला आहे. या नर्सने आत्महत्या केली की हत्या या बाबत संशय व्यक्त केला जात आहे. सीमा सुरेश डोंगरे असे या मयत नर्सचे नाव आहे. ती बीडच्या दीप रोड परिसरातील रहिवासी होती. ती नर्स म्हणून कामाला होती.
या महिलेवर अवैध गर्भपात केल्याचा आरोप होता.या प्रकरणात तिच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता.आरोपी सीमाचा मृतदेह तलावात सापडला. तिचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस हत्या आहे की आत्महत्या याचा शोध लावत आहे.