मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अर्थात शनिवारी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करतील. याशिवाय, मुख्यमंत्री दोन्ही जिल्ह्यातील इतर महामार्गाच्या कामांचाही आढावा घेतील.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. एकूण 710 किलोमीटरच्या या द्रुतगती महामार्गासाठी जवळपास 56 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे.
१२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यांतील आणि २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.