Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार

कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार
, सोमवार, 28 डिसेंबर 2020 (08:45 IST)
ब्रिटन, युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.
 
ब्रिटन, लंडनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्तांनी खबरदारी म्हणून आता सात दिवसानंतर कोरोना टेस्ट बंधनकारक केली आहे. ब्रिटनहून  परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतात पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत एकही प्रवासी पॉझिटिव्ह नसला तरी महिनाभरात ब्रिटनहून परतलेल्या सगळ्या प्रवाशांची होणार कोरोना टेस्ट होणार आहे.
 
मुंबईत रविवारपासून ब्रिटनहून तब्बल ५९१ पेक्षा जास्त नागरिक परतले आहेत. मात्र आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या प्रवाशांमध्ये मुंबईतील १८७ आणि  राज्यातील १६७ तर परराज्यातल्या २३६ प्रवाशांचा समावेश आहे. यातील २९९ जणांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर इतर राज्यांतील प्रवासी दुसऱ्या विमानाने आपापल्या राज्यात परतले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९४.२९ टक्के