Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ड्रग्स माफिया ललित पाटीलचा ताबा आता पुणे पोलिसांकडे, न्यायालयाने दिली परवानगी

lalit patil
, मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (21:11 IST)
मुंबई : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. न्यायालयाने पुणे पोलिसांना ताबा घेण्याची परवानगी दिली.
 
राज्यात गाजलेल्या नाशिकमधील मेफेड्रोन प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलचा अधिक खोलवर तपास करण्यासाठी पुणे पोलिसांना त्याचा ताबा मिळवणं गरजेचं होत. त्यामुळे न्यायालयाने पुणे पोलिसांना ललित पाटीलला ताब्यात घेण्यासाठी परवानगी दिली आहे. पुणे पोलिसांचा तपास ललित पाटीलच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत केलेल्या चौकशीत अनेक आरोपीना अटक केली असून पुणे पोलिसांकडून ससूनचादेखील तपास सुरु आहे. ललित पाटीलला कोण मदत करत होतं? तसेच या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते. आणि अखेर पुणे पोलिसांना ललित पाटीलचा ताबा मिळालेला आहे. आणि या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून केली जाणार आहे.
 
ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला आहे. मात्र दुसरीकडे ललित पाटीलने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “पुणे पोलिसांनी मला मारहाण केली होती. पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे, आणि पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका आहे” असे गंभीर आरोप त्याने न्यायालयात पुणे पोलिसांवर केले. मात्र तरीही न्यायालयाने त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात सोपवले आहे.
 
पुणे पोलीस,येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापक यांच्यावर संशयाची सुई वळली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. मी ससून रुग्णालयातून पळालो नसून मला पळवण्यात आलं होत, असंदेखील तो म्हणाला होता. त्याच्या या विधानामुळे मोठा संशय निर्माण होऊन खळबळ उडाली होती. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहचले आहेत? ललितला कोणाचा छुपा पाठिंबा होता का? त्याच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून? यांसारख्या असंख्य प्रश्नाची उत्तरे सखोल चौकशीतून समोर येतीलच. ललित पाटील प्रकरणाच्या मुळाशी जाऊन राज्यातून ड्रग्स , मेफेड्रोन सारख्या अमली पदार्थाचे रॅकेट पोलिसांना उध्वस्त करावे लागणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासात काय समोर येत? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Complaint to Ratan Tata थेट रतन टाटांनाच केली कारची तक्रार