Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय, लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार

पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय, लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (16:48 IST)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी कोविड-१९ रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. राज्यातील लॉकडाऊन 31जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यात पुन्हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
या सूचना बंधनकारक
- सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
- सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक
- साबणाने सतत हात धुणे आवश्यक
 
नव्या स्ट्रेनमुळे लॉकडाऊनमध्ये वाढ
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे तीन प्रकार समोर आले होते. जगभरातील अनेक देशांत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळले होते. राज्यातही नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 
 
उपहारगृहे, दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Economic Survey 2021: भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा वेगाने धावेल, जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील 5 महत्त्वाच्या गोष्टी