Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उलटून भीषण अपघातात 4 जण जखमी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उलटून भीषण अपघातात 4 जण जखमी
, रविवार, 16 जून 2024 (12:37 IST)
सोलापूर- धुळे महामार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 4 जण जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

सदर घटना छत्रपती संभाजीगर जिल्ह्यातील पाचपीर वाडी फाटा शिवारात सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली. वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटून कार उलटली आणि या मध्ये बसलेले गुजरातचे रहिवासी सुदैवाने बचावले. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चार जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सोलापूर धुळे महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार 4 -5 वेळा उलटली आणि अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहे. वाहनात गुजरातचे प्रवासी होते.  
 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SCO vs AUS : ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय, स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर