Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर २ उपमुख्यमंत्र्यांचा डोळा – नाना पटोले

nana patole
, शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (08:01 IST)
मुंबई : राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहेत. सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
 
दरम्यान नाना पटोले म्हणाले की, या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल असे सरकारने जाहीर केले होते पण त्यात पुन्हा सुधारणा करावी लागली.
 
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तीन पक्षांच्या या सरकारला जनतेच्या समस्यांचे काहीही पडलेले नाही. राज्यातील प्रशासन कोलमडले आहे, तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केले जात आहे, हे चांगले लक्षण नाही. प्रशासनावर सरकारचा वचक नसल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, आधी अतिवृष्टी झाली तर आता पाऊसच गायब झाला आहे. खरीपाची पिके धोक्यात आली आहेत. जनता बेहाल असताना त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी सरकारी तिजोरी कोण जास्त लुटतो याची तीन पक्षात स्पर्धा सुरु आहे.
============================
5. अजित पवार गट लागला लोकसभेच्या तयारीला, नेते करणार राज्याचा दौरा
 
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीतील दोन गटांतील आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी बंद झाली असली तरी पक्षावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी सुप्त संघर्ष सुरूच आहे. लोकसभा व पाठोपाठ येणार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षाची बांधणी करण्याचे अजित पवार गटाने ठरवले असून प्रमुख नेते लवकरच लोकसभा मतदारसंघनिहाय राज्याचा दौरा करणार आहेत.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्या नंतर पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुढील काळात कोणकोणते कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत याची माहिती दिली. या बैठकीत पक्षाची ध्येयधोरणे, राज्यव्यापी संघटन यावर चर्चा केली. पुढच्या आठवड्यात कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. पक्षाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवणार आहोत. मी स्वत: राज्याच्या दौ-यावर जाणार आहे. राज्यात ९ मंत्री आहेत. त्यांचा जनता दरबार अ ५ बंगल्यावर सुरू केला जाणार असल्याचे तटकरे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय स्वातंत्र्य दिन विशेष लेख सातारचे प्रतिसरकार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्ण पान