Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकऱ्याने कोथिंबीर वाटली फुकट

शेतकऱ्याने कोथिंबीर वाटली फुकट
, गुरूवार, 9 मार्च 2023 (08:09 IST)
मनमाड : वातावरणातील सततचे बदल, निसर्गाचा लहरीपणा या सगळ्याशी दोन हात करत रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला पिकवतो. मनमाड येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात कोथिंबीरीचे पीक घेतले होते, मात्र कोथंबिरीला कवडीमोल मिळत असल्याने मेटाकुटीला आलेल्या दिलीप सांगळे या शेतकऱ्याने अक्षरशः कोथिंबीरी फुकट वाटली आहे.
 
शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असताना मनमाडमध्ये दिलीप सांगळे या शेतकऱ्याने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कोथिंबीरला व्यापारी घ्यायला तयार नसल्याने, त्यांनी नाराज होऊन रस्त्यावर ओरडून ओरडून कोथिंबीर चक्क फुकट वाटली.
 
कोथिंबीर पिकासाठी त्यांना १५ हजार रुपये खर्च आला. मात्र, पदरात काहीच पडत नसल्याने अखेर त्यांना कोथिंबीर बाजारात फुकट वाटण्याची वेळ आली. अस्मानी-सुलतानी संकटात अडकलेला शेतकरी आता पुरता हवालदिल झाला असून, अगदी पदरमोड करून व प्रसंगी कर्ज घेऊन उभे केलेल्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
 
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली कोथिंबीर विक्री होत नसल्याने श्री. सांगळे हैराण झाले.
 
कोथंबिरीला व्यापारी भाव लावत नसल्याने तिची विक्री होत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या सांगळे यांनी बाजार समितीत कोथिंबीर विकण्यापेक्षा ती नागरिकांना फुकट वाटल्यास आशीर्वाद तरी मिळेल, या भावनेने भाजी बाजारात रस्त्यावर उभे राहून ओरडुन ओरडुन ही कोथिंबीर नागरिकांना फुकट वाटली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोमल काळे : 'लग्न झालेली, एक मुलगा असणारी महिला बाऊन्सर? लोक नावं ठेवतातच'