अहमदनगर तालुक्यातील ससेवाडी येथील शेतकरी कर्जाला कंटाळून दिलीप अण्णा मगर (वय 53) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ससेवाडी येथील शेतकरी दिलीप मगर यांना ७ एकर जमीन असून त्यांच्याकडे सोसायटी व विविध बँकांचे कर्ज होते. नैसर्गिक आपत्ती व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे अस्मानी व तुलतानी संकटात सापडल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत. कांदा लागवडीसाठी उत्पन्नाच्या भरवशावर कर्ज काढून कांदा लागवड केली. परंतु हवामानाने साथ न दिल्याने झालेला खर्च देखील वसूल न झाल्याने मगर यांनी कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.